गेवराई तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:19 IST2018-12-07T16:19:16+5:302018-12-07T16:19:42+5:30

वारुळे यांनी दहा वर्षांपूर्वी गावातीलच सोसायटीकडून कर्ज घेतले होते.

Farmer suicides due to debt in Gevrai taluka | गेवराई तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून ७० वर्षीय शेतकऱ्याने गुरुवारी विषारी द्रव प्राशन केले. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

बाबूराव देवराव वारुळे (रा. वडगाव ढोक, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वारुळे यांनी दहा वर्षांपूर्वी गावातीलच सोसायटीकडून कर्ज घेतले होते. यावर्षी नापिकीमुळे शेतात पीक आले नाही. त्यामुळे हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी गुरुवारी सायंकाळी शेतामध्ये विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार समजताच मुलगा भानुदासने तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Farmer suicides due to debt in Gevrai taluka