शेतकरी नेते थावरे पोलिसांच्या नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:00 IST2019-08-26T23:58:57+5:302019-08-27T00:00:16+5:30
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या थकबाकी संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेशित करुनही अंमलबजावणी होत नसल्याने २६ आॅगस्ट रोजी खंडपीठाच्या दारात काळ्या पट्ट्या बांधून न्याय मागणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी दिला होता.

शेतकरी नेते थावरे पोलिसांच्या नजरकैदेत
माजलगाव : उस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या थकबाकी संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेशित करुनही अंमलबजावणी होत नसल्याने २६ आॅगस्ट रोजी खंडपीठाच्या दारात काळ्या पट्ट्या बांधून न्याय मागणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर २५ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता थावरे यांना माजलगाव शहर पोलीस प्रशासनाने नजर कैदेत ठेवले आहे. जयमहेश शुगर इंडस्ट्रीज, वैद्यनाथ कारखाना, लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम थकवली होती. या संदर्भात २५ जून रोजी उच्च न्यायालयाने सदर रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कारखान्यांकडून हालचाल होत नसल्याने थावरे यांनी साखर आयुक्तांना निवेदन दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये राकाँच्या महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.