विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:53 IST2019-08-25T00:52:45+5:302019-08-25T00:53:23+5:30

शेतात फेरफटका मारताना बोअरच्या मोटारीसाठी असलेल्या विद्युत केबलला स्पर्श झाल्याने धक्का लागून शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वा. मादळमोहीजवळील शिवारात घडली.

Farmer dies in lightning strike | विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

गेवराई : शेतात फेरफटका मारताना बोअरच्या मोटारीसाठी असलेल्या विद्युत केबलला स्पर्श झाल्याने धक्का लागून शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वा. मादळमोहीजवळील शिवारात घडली.
श्रीराम अनंत मुळे (वय ७०) असे मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. शनिवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या शेतात पिकाला वेढा करण्यासाठी मुळे हे गेले होते. मुगाच्या शेंगा खात असतानाच अचानक शेतातील बोअरच्या मोटारीसाठी असलेल्या विद्युत केबलला स्पर्श झाल्याने धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीराम मुळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे.

Web Title: Farmer dies in lightning strike