तोतयागिरी ! अंबाजोगाईत बारावीची परीक्षा देत होता अकरावीचा विद्यार्थी !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:41 IST2019-03-14T17:40:57+5:302019-03-14T17:41:37+5:30

 अंबाजोगाई तालुक्यातील साकुडच्या युवकांचा कारनामा

fake! In Ambajogai student of eleventh class appears HSC examination over other student | तोतयागिरी ! अंबाजोगाईत बारावीची परीक्षा देत होता अकरावीचा विद्यार्थी !!

तोतयागिरी ! अंबाजोगाईत बारावीची परीक्षा देत होता अकरावीचा विद्यार्थी !!

अंबाजोगाई (बीड ) : येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात बुधवारी (दि.१३) बारावीची परीक्षा देणा-या तोतया अल्पवयीन परीक्षार्थ्यास केंद्रप्रमुखांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी केंद्रसंचालिका उषा सरदार यांच्या तक्रारीवरून परीक्षार्थी आणि तोतया या दोघांवरही शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.
 
सदरील दोन्ही युवक साकुड येथील आहेत. तोतया युवक अंबाजोगाई शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. बुधवारी त्याने त्याच्याच नात्यातील बारावीच्या परीक्षार्थीच्या जागेवर बसून संरक्षणशास्त्र विषयाचा पेपर देण्याचा प्रयत्न केला. तो हॉल क्रमांक २११ मध्ये होता. त्या हॉलवर पर्यवेक्षण करणारे प्रा. धुमाळ यांना ओळखपत्रावरील छायाचित्रावरून संशय आला. त्यांनी केंद्र संचालिका प्रा. उषा सरदार (चिंचोलीकर) यांना ताबडतोब माहिती दिली. त्यांनी तोतया परीक्षार्थीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा त्या दोन्ही युवकांवर विद्यापीठ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. 

Web Title: fake! In Ambajogai student of eleventh class appears HSC examination over other student