शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णांच्या गृह विलगीकरणाची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

आष्टी : दिवसेंदिवस शहरी भागात कमी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे कोरोनाबाधित ...

आष्टी : दिवसेंदिवस शहरी भागात कमी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना दहा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. परंतु रुग्ण घरी गेल्यानंतर त्याला पुन्हा त्रास होत आहे. तरी आरोग्य विभागाने विलगीकरण दहाऐवजी सतरा दिवस करावे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी राज्याचे आरोग्य संचालक डाॅ. रामास्वामी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संक्रमित रुग्णासाठी गृृृृह विलगीकरणासाठी दहा दिवसांची मुदत दिलेली आहे. तथापि ग्रामीण भागात आम्ही केलेल्या पाहणीमध्ये असे आढळून येत आले की, ग्रामीण भागातील रुग्णांची परिस्थिती पाहता, गृह विलगीकरणामध्ये दहा दिवस राहिलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा शारीरिक त्रास होत आहे. त्याचा संसर्ग पुन्हा अधिक बळावत असेल. यानंतर वीसपर्यंत स्कोर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. त्यानुसार संक्रमित रुग्णाच्या गृह विलगीकरणाची मुदत आणखी किमान सात दिवस वाढवण्याची आवश्यकता आहे, असेही धस यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.