खळबळजनक ! वृद्ध बहिण- भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 16:59 IST2022-02-24T16:57:53+5:302022-02-24T16:59:02+5:30
परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत उघडकीस आली खळबळजनक घटना

खळबळजनक ! वृद्ध बहिण- भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या
परळी( बीड): तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहीण -भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. हत्याची ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली आहे. दुपारपर्यंत हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही .
परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा ग्यानबा मुंडे रा जिरवाडी( ६८ )वर्ष यांचे शेत आहे याच शेतात त्यांच्या बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे (७०) त्यांच्याकडे राहत असत, या दोघा बहीण-भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आली.
जिरेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी जमले असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी ही पोहोचले आहे परळी पासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे सोमेश्वराचे मंदिर आहे या गावात गेल्या पंचवीस वर्षात सहसा अनुचित प्रकार घडत नाहीत. धार्मिक वारसा असलेल्या जिरेवाडी गावात गुरुवारी बहीण-भावांची हत्या झाल्याने जिरेवाडी गाव हादरले आहे.