खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 15:53 IST2022-01-22T15:51:27+5:302022-01-22T15:53:29+5:30
पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले असून पुढील तपास सुरु आहे

खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून
केज (बीड) : तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथील पारधी वस्तीवरील ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
नांदूरघाट येथून जवळच असलेल्या हंगेवाडी येथील पारधी वस्तीवर सखुबाई बन्सी शिंदे या महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी घटनास्थळावर धाव घेत घेतली.
पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले आहे. घटनास्थळी पोलीस पथकातील कर्मचारी मेसे, भालेराव, शिवाजी शिनगारे, मतीन शेख हे तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.