बीडमध्ये खळबळ ! जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात दोघांवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 11:51 IST2022-02-25T11:50:20+5:302022-02-25T11:51:19+5:30
दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

बीडमध्ये खळबळ ! जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात दोघांवर गोळीबार
बीड: येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोळीबार झाला. यात दोघे जखमी झाले असून या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सतीश बबन क्षीरसागर (३०, लक्ष्मणनगर ,बीड) व फारूक सिद्दीकी (२८ , जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. ते दोघे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेने खळबळ उडाली आहे.उपअधीक्षक संतोष वाळके, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीता एन. राव, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली असून जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.