चिंचाळ्यात ॲंटिजन चाचणीत सगळेच निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST2021-06-04T04:26:10+5:302021-06-04T04:26:10+5:30
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. गावातील लोक कोरोना चाचणी करत नसल्यामुळे गावातील आकडा शून्य येतोय ...

चिंचाळ्यात ॲंटिजन चाचणीत सगळेच निगेटिव्ह
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. गावातील लोक कोरोना चाचणी करत नसल्यामुळे गावातील आकडा शून्य येतोय काय, अशी भीती ग्रामपंचायतच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात संपर्क साधून व्यक्त केली होती. त्यामुळे ३ जून रोजी गावात ॲंटिजन चाचणी शिबिराचे आयोजन केले.
यात लक्षणे असलेल्या ५६ नागरिकांचे नमुने घेण्यात आले. यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गावातील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षक अंगणवाडी कर्मचारी, आशाताई यांनी केलेल्या जनजागृतीचा फायदा होत असल्याचे दिसून आले. सर्व ग्रामस्थ कोरोनाचे नियम पाळत आहेत. मास्क व सॅनिटायझर वापरत आहेत, लस घेत आहेत. शिबिरासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य वैज्ञानिक नागेश कारंडे, जनसंपर्क आरोग्य अधिकारी आकाश पवार, आरोग्य कर्मचारी अर्शद शेख, संजय सानप हे उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करून भीतीमुक्त केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी उपसरपंच अशोक पोकळे, दिगंबर पोकळे, मुख्याध्यापक रत्नाकर चव्हाण, आशा वर्कर सुनीता भगत, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण पोकळे,अविनाश पोकळे यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
030621\img-20210603-wa0611_14.jpg