अखेर त्या आरोपीला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:05+5:302021-03-13T05:00:05+5:30
कडा : अल्पवयीन मुलीला फूस लावुन चारचाकी गाडीतून पळवणाऱ्या व नंतर घटना समजाताच मुलीला सोडुन पळ ...

अखेर त्या आरोपीला ठोकल्या बेड्या
कडा : अल्पवयीन मुलीला फूस लावुन चारचाकी गाडीतून पळवणाऱ्या व नंतर घटना समजाताच मुलीला सोडुन पळ काढणाऱ्या राहुल शितोळे यास कडा परिसरात अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला एका तरूणाने २ मार्च रोजी दुपारी फूस लावून चारचाकी वाहनातून पळविले होते. मुलीचा शोध घेतला ती मिळुन न आल्याने चौकशी केली असता तिला शितोळे याने पळविल्याचे समजातच त्याने कडा धामणगांव रोडवर मुलीला सोडून पळ काढला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात दाखल झाला. दहा दिवसाची कालावधी उलटला तरी देखील आरोपी मोकाटच असल्याचे व पीडितेचे नातेवाईक आंदालन करणार असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारी प्रकाशित करताच दुपारी बाराच्या सुमारास आरोपीला कडा परिसरात बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखीला पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलिस नाईक बाबासाहेब गर्जे, पोलिस शिपाई विजय दुधाळ यांनी केली.