शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

बीड : सध्या सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी चर्चा आहे आणि मुख्यत्वेकरून ही लाट लहान मुलांना त्रास देईल, अशी शक्यता ...

बीड : सध्या सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी चर्चा आहे आणि मुख्यत्वेकरून ही लाट लहान मुलांना त्रास देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरता सर्वच पातळ्यांवर दक्षता घ्यावी आणि मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण करावे. त्याचबरोबर मुलांना फ्लूची लस देण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराग पांगरीकर यांनी दिला आहे.

ज्या - ज्या कुटुंबांमध्ये मोठ्यांना कोरोना झाला, त्या कुटुंबातील लहान मुलांमध्येसुद्धा हे इन्फेक्शन झालेले आढळून आले आहे. डिसेंबर २० व जानेवारी २१मध्ये झालेल्या सिरो सर्वेक्षणामध्ये मोठी माणसे व मुले हे बरोबरीनेच जवळपास २५ टक्के एवढे अँटिबॉडी तयार झालेले दिसले आहे. म्हणजे तिसरी लाट आली तरी लहान मुले व मोठी माणसे बरोबरीनेच इनफेक्ट होण्याचीच शक्यता जास्त वाटते. त्यामुळे फक्त लहान मुलांना इन्फेक्शन होईल, हा कयास योग्य वाटत नसल्याचे ते म्हणाले.

लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे काय?

लहान मुलांमध्ये आतापर्यंत ताप, सर्दी, खोकला, चव जाणे, पोटदुखी, भूक कमी होणे, कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. त्यामध्ये जवळजवळ ९० - ९५ टक्के हे सौम्य स्वरूपात असतात. पाच ते दहा टक्के हे मध्यम व तीव्र स्वरूपाचे असू शकतात. एक ते दोन टक्क्यांमध्ये तीव्र कोरोना अथवा मल्टी सिस्टेमिक इनफ्लामेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन हा प्रकार लहान मुलांमध्ये दिसतो. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना इन्फेक्शन झाले तरीही त्यामध्ये असिम्प्टोमॅटिक अथवा माईल्ड सिम्प्टोमॅटिक (सौम्य लक्षणे) असणाऱ्या आजाराचे प्रमाण जास्त असणे अपेक्षित आहे.

टास्क फोर्सची राहणार नजर

साधारण पाच ते सात टक्के मुलांना ॲडमिट करण्याची गरज पडू शकते. एक ते दोन टक्के मुलांना सिरीयस आजार अथवा ‘मल्टी सिस्टेमिक इनफ्लामेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन’ होऊ शकेल. त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्स तयार करून अशा प्रकारच्या उपाययोजना शासनाने करण्यास सुरुवात केली आहे. बालरोगतज्ज्ञ व शासन या दृष्टीने सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

१) मास्क, हातांची स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंग पाळणे चालू ठेवावे. २) काही लक्षणे जसे सर्दी अथवा ताप असलेल्या मुलांबरोबर आपल्या मुलांना खेळण्यास पाठवू नये. ३) आपण स्वतः बाहेर असताना आपल्याला कोराेना इन्फेक्शन होऊन आपण घरात जाऊन मुलांना ते इन्फेक्शन देऊ, अशा प्रकारे वागू नये. ४) मुलांना घरच्या घरी व्यायाम करायला लावा व सकस आहार द्या. ५) आपल्या मुलांना ताप, सर्दी, संडास, खोकला आल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञांना दाखवावे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तपासण्या करून घ्याव्या. त्यांनी पुनर्तपासणीसाठी जेव्हा बोलावले असेल तेव्हा परत जाऊन दाखवावे. ६) मुलांना काही लक्षणे दिसली तर पहिल्या दिवशी दाखवावे. घरी उपचार करून वेळ वाया घालवू नये. ७) मुलांचे लसीकरण मागे पडले असेल तर आपल्या बालरोगतज्ज्ञांना दाखवून लसीकरण पूर्ण करून घ्यावे.

फ्लू लसीकरण करून घ्यावे

पावसाळ्यात आपल्याकडे साधारण फ्लू व स्वाईन फ्लू हा आजार दिसतो. यामध्ये सर्दी, ताप व खोकला असतो. अशीच लक्षणे कोरोना या आजारात दिसतात. त्यामुळे आपल्या मुलांना फ्लू व स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून आय. ए. पी. ( इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक) ने सांगितल्याप्रमाणे सहा महिने ते पाच वर्षांमधील सर्व मुलांना फ्लूचे डोस दिलेच पाहिजेत. पाच वर्षांवरील सर्व मुलांनासुद्धा फ्लूचे डोस देणे योग्य राहील. याशिवाय कमार्डिबीडीटी असणाऱ्या वयस्कर लोकांनी, हेल्थकेअर वर्कर्सनी व गर्भवती महिलांनीसुद्धा पावसाळ्यापूर्वी फ्लूचा डोस घेणे योग्य राहील.

डॉ. अनुराग पांगरीकर, बालरोगतज्ज्ञ, बीड.

१) दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे १८ वर्षांखालील रुग्ण - ८२००

२) १० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण - २५००