अंबाजोगाईत वीज बंद तरीही शेतकऱ्यांना लाखोंचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:29 IST2018-03-24T00:44:47+5:302018-03-24T11:29:13+5:30
शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.

अंबाजोगाईत वीज बंद तरीही शेतकऱ्यांना लाखोंचा भुर्दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात सन २०१२-१३ सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या कालावधीत पूस, गिरवली परिसरातील विद्युत पंप बंद राहिले. तरीही महावितरणच्या वतीने चालू विद्युत बिलात या काळातील रकमा शेतकºयांच्या नावावर टाकण्यात आल्या. टंचाईच्या काळात जिल्हाधिकाºयांनी ज्या ठिकाणचे विद्युतपंप बंद आहेत. तसेच आरक्षित तलावाच्या क्षेत्रातील ज्या कृषी पंपाचे वीजजोडणी बंद केलेली आहे. अशा ग्राहकांना बिलात सवलत मिळावी. असे आदेश महावितरणला दिले होते. तीन वर्षानंतर त्या बंद विद्युतपंपांची रक्कम आता पुन्हा शेतकºयांच्या नावावर जमा झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता, जवळगाव, नांदगाव, सायगाव, जोगाईवाडी, तटबोरगाव येथील ३३ शेतकºयांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करून कृषी पंपांची विद्युत देयके दुरूस्त करून देण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. या संदर्भात महावितरणचे कार्याकारी अभियंता मंदार वग्यानी यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भातील पाठपुरावा वरिष्ठ कार्यालयाकडे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहक पंचायत शेतकºयांच्या पाठीशी
४महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असतांना नदी, नाले, पाझर तलाव,मध्यम प्रकल्प, साठवण तलाव यातील पाणी सतत तीन वर्षे आरक्षित होते. शासनाने तसे आदेशही काढलेले होते. अशा स्थितीत बंद असलेल्या कृषी पंपाचे विद्युत देयके शेतकºयांच्या माथी मारण्यात आली आहेत.
४या संदर्भात कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना तसे पत्र देण्यात आले आहे. विद्युत बिलांची दुरूस्ती न झाल्यास ग्राहक पंचायतच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागीय संघटक जनार्धन मुंडे यांनी दिला आहे. असे असले तरी वीज मंडळाने वाढीव बिले देऊन शेतकºयांना अडचणीत आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
४तालुक्यातील ३३ शेतकºयांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करुन कृषी पंप बिले दुरुस्तीची मागणी केली आहे.