बीडमध्ये दहावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच व्हॉट्सॲपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 14:22 IST2019-03-05T14:21:36+5:302019-03-05T14:22:43+5:30
एका तासातच 'डी' सेट प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल.

बीडमध्ये दहावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच व्हॉट्सॲपवर
- नृसिंह सुर्यवंशी
बीड : जिल्ह्यातील घाटनांदूर येथे दहावीची परिक्षा सुरू असून येथील श्री सोमेश्वर विद्यालय येथे एकून २२५ विद्यार्थी तर श्री शंकर विद्यालय येथे २१५ विद्यार्थी परिक्षा देत आहेत . दोन्हीकडे कॉपीचा सुळसुळाट आहे. आज येथे इंग्रजी विषयाची परिक्षा सुरु असताना पेपर सुरु झाल्यानंतर एक तासातच प्रश्नपत्रिकेचा 'डी' सेट व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला.
प्रश्नपत्रिकेचे फोटो एका व्हॉट्सॲप ग्रुपवर १२ वाजून o६ मिनीटांनी आली. विशेष म्हणजे 'डी' सेटच्या या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण १२ पाने या ग्रुपवर आली. पेपर कोणत्या सेंटरवरून व्हायरल करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही .
पोलिस संरक्षण दोन्ही केंद्राला आहे. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कडक नियम आहेत. मग पेपर तासाभरात बाहेर कसा आला हे एक मोठे कोडे आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपवर गावातील अनेक प्रतिष्ठित नागरीक आहेत. याबाबत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवने यांना विचारले असता, 'पहातो' एवढेच उत्तर त्यांनी दिले. तर तहसीलदार रूईकर यांच्याशी संपर्क व्हाऊ शकला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत दुजोरा दिला नसला तरी यावर जर्वाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.