शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

बीडमध्ये अभियंत्यावर रोखले पिस्तूल; अशोक रोमनसह १० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एका व्यापाऱ्याशी झालेल्या व्यवहारानंतर ते भेटत नसल्याने त्यांच्याविषयी अभियंता प्रशांत संचेती यांना माहिती विचारत त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पेठ बीड भागात २० मे रोजी घडला आहे. या प्रकरणी अशोक रोमन याच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एका व्यापाऱ्याशी झालेल्या व्यवहारानंतर ते भेटत नसल्याने त्यांच्याविषयी अभियंता प्रशांत संचेती यांना माहिती विचारत त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पेठ बीड भागात २० मे रोजी घडला आहे. या प्रकरणी अशोक रोमन याच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रोमन याने परसमल बाबूलाल संचेती हे कोठे आहेत, ते फोन उचलत नाहीत. त्यांच्याशी माझा व्यवहार झाला असुन ते कोठे राहतात हे सांगा, असे म्हणून रोमन याच्यासह साथीदारांनी लाथा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व त्याच उद्देशाने अशोक रोमन याने त्याच्या कमरेचे रिव्हॉलवर किंवा गावठी कट्टा काढून अभियंत्यांच्या दिशेने लावला. त्यानंतर मंगळवारी संचेती यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी अशोक बाबूराव रोमन याच्यासह इतर आठ ते दहा जणांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक रोमन तडीपार आरोपीअशोक रोमन हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले. परंतु स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे तो बीडमध्ये खुलेआम फिरत होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. बीड शहरात सध्या आजही तडीपार आरोपी खुलेआम फिरत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडFiringगोळीबारMarathwadaमराठवाडा