शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

परळीकरांवरील जलसंकट दूर; नागापूरचे वाण धरण शंभर टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:16 IST

पाणी धरणाच्या सांडव्यावरून वाहण्यास सुरूवात झाली आहे.

- संजय खाकरेपरळी (बीड) : शहराला पाणी पुरवठा करणारे तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम धरण  शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजता १०० टक्के भरले. पाणी धरणाच्या सांडव्यावरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. धरण भरून जलसंकट दूर झाल्याने परळीकरांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाण धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना शेतीसाठी पाण्याची सोय झाली आहे. 

१९६६ मध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या परळी तालुक्यातील नागापूर वाण धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता 19.72 द.ल.घ.मी एवढा आहे. धरणातील लाभक्षेत्रातील गावांमध्ये परळी तालुक्यातील नागापूर, माळहिवरा, मांडेखेल, तळेगाव, तडोळी, भिलेगाव, परचुंडी, लिंबूटाचा समावेश आहे. परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वाण धरणात पावसाच्या पाण्याची आवक गेल्या दहा दिवसांपासून  सुरू झाली आणि आज सकाळी हे धरण पूर्ण भरले. उन्हाळ्यात  धरणाची पाणी पातळी घटल्याने परळीनगर परिषदेने शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा चालू होता. शहरात सुधारित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन लवकरच नगरपालिकेला करावे लागणार आहे. दरम्यान  नागपूर धरण भरल्याने परळी शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आश्विन शंकरआप्पा मोगरकर यांनी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

धरणाखालील गावांनी सतर्क राहावे तालुक्यातील नागापूर वाण धरण शुक्रवारी सकाळी शंभर टक्के भरले आहे. या धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी तहसील प्रशासनांना कळविले आहे. - रमेश पांचाळ, शाखा अभियंता, नागापूर धरण

टॅग्स :BeedबीडRainपाऊस