बीड : येथील जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या (जैन भवन) २० संचालक पदांसाठी आज, १४ मार्च रोजी मतदान होत आहे. संस्थेच्या त्रैवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची ही निवडणूक हाेत आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ वोजपर्यंत मतदान होणार असून, १३२ सभासद मतदानासाठी पात्र आहेत. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. या निवडणुकीत नितीनचंद्र कोटेचा व ॲड. आर. बी. भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पन्नालाल कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली गुरू आनंद गुरू गणेश पॅनेलचे २० उमेदवार रिंगणात आहेत. या पॅनेलचा मुकाबला मदन कांतीलाल दुगड यांच्या नेतृत्वाखालील १३ उमेदवारांच्या सकल जैन समाज परिवर्तन पॅनेलशी आहे. ही निवडणूक धर्मादाय आयुक्त व औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार होत असून, निरीक्षक म्हणून द. ल. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६७ मते मिळविणारे पॅनेल विजयी होणार असून, अटीतटीची होणाऱ्या या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
जैन दिवाकर संस्थेची आज निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST