पेंडगावजवळ कारच्या धडकेत वृद्ध महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:21 IST2019-04-20T00:20:55+5:302019-04-20T00:21:41+5:30

तालुक्यातील पेंडगाव येथे रस्ता ओलांडतांना भरधाव कारने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या उमा रामभाऊ माळी (७० रा.पांढरवाडी ता.गेवराई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Elderly woman killed in a car crash near Pendgaon | पेंडगावजवळ कारच्या धडकेत वृद्ध महिला ठार

पेंडगावजवळ कारच्या धडकेत वृद्ध महिला ठार

बीड : तालुक्यातील पेंडगाव येथे रस्ता ओलांडतांना भरधाव कारने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या उमा रामभाऊ माळी (७० रा.पांढरवाडी ता.गेवराई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर कारचालक पसार झाला.
पेंडगाव येथे नातेवाईकाकडे आलेल्या उमा माळी या सायंकाळी रस्ता ओलांडून गावात जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या हातपायासह डोक्याला गंभीर मार लागला. नातेवाईकांनी उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालक कारसह पसार झाला. या प्रकरणी निलाबाई भाऊसाहेब पवार यांच्या खबरेवरुन रुग्णालय पोलीस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली.

Web Title: Elderly woman killed in a car crash near Pendgaon