शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

वृद्ध, निराधार व दिव्यांगांची कुचंबणा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : शासनाने मंजूर केलेल्या यादीत आपल्या नावाचा समावेश झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी वृद्ध, निराधार व दिव्यांगांची ...

अंबाजोगाई : शासनाने मंजूर केलेल्या यादीत आपल्या नावाचा समावेश झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी वृद्ध, निराधार व दिव्यांगांची मोठी गर्दी तहसील कार्यालयात झाली आहे. मात्र, तहसील कार्यालयाने भिंतीवर चिकटविलेली यादी खूपच अस्पष्ट असल्याने नावही नीट दिसत नाही. विचारायला गेले तर कोणी नीट सांगतही नाही. परिणामी लाभार्थ्यांची मोठी कुचंबणा होऊ लागली आहे. शासनाने वृद्ध, निराधार व दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यासाठी संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून अशा लाभार्थ्यांना मासिक अनुदान देण्याची योजना पूर्वीपासूनच कार्यान्वित केली आहे. मात्र, या योजनेत सातत्याने नवीन लाभार्थ्यांचा समावेश केला जातो. तहसीलदार व योजनेच्या समितीच्या माध्यमातून अशा लाभार्थींची निवड दर तीन ते चार महिन्यांनी होते. या योजनेत समावेश व्हावा, यासाठी हजारो अर्ज दाखलही होतात. या अर्जांची छाननी करून लाभार्थींची निवड केली जाते. अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वीच अशा १६०० व्यक्तींची निवड झाली आहे. ही निवड झाल्यानंतर तहसील कार्यालयाने लाभार्थींची निवड झालेली यादी तयार करून तहसील कार्यालयाच्या भिंतीवर चिकटविली आहे. मात्र, चिकटविलेली यादी खूपच अस्पष्ट आहे. या यादीतील नावे नीट वाचताही येत नाहीत. जर कार्यालयात कोणाला विचारले तर नीट उत्तरही मिळत नाही. अशा स्थितीत या वृद्ध निराधारांची मोठी उपेक्षा होते. या अनुदानाच्या यादीत आपला समावेश आहे की नाही, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, अनेकांना यात आपला समावेश झाला की नाही, हे समजणेही मोठे जिकिरीचे काम झाले आहे. वृद्ध, निराधार, दिव्यांगांची गैरसोय दूर करा. अंबाजोगाई शहर व कार्यालयातील अनेक वृद्ध, निराधार, दिव्यांग महिला व पुरुष या निराधार योजनेच्या यादीत आपला समावेश आहे की नाही, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत. मात्र, यादीच अस्पष्ट असल्याने नावेही ओळखू येईनात. परिणामी लाभार्थींची मोठी गैरसोय झाली आहे, ही गैरसोय दूर करावी.

-विजय कोंबडे, सामाजिक कार्यकर्ते, अंबाजोगाई.

या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक अडचणीमुळे यादी अस्पष्ट आली असेल. उद्या ती यादी नव्याने स्पष्ट स्वरूपात चिकटवून झालेली गैरसोय दूर केली जाईल.

-विपीन पाटील, तहसीलदार, अंबाजोगाई.

270721\3939img-20210727-wa0074.jpg

वृद्ध ,निराधार व दिव्यांग यांना निराधार योजनेची यादी ही स्पष्ट दिसेना