परळी येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे 'जवाब दो' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 19:21 IST2018-08-20T19:19:55+5:302018-08-20T19:21:07+5:30
अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे शासनाचा निषेध करत आज सकाळी 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.

परळी येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे 'जवाब दो' आंदोलन
परळी (बीड) : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणी अद्याप मुख्य आरोपींना अटक झाली नाही. यामुळे अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे शासनाचा निषेध करत आज सकाळी 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पी. एस. घाडगे गुरुजी, बाजीराव धर्माधिकारी, प्रेमनाथ कदम, प्रा. विलास रोडे, रानबा गायकवाड, रोहिदास बनसोडे यांचा सहभाग होता.