शेतकऱ्यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:47+5:302021-02-05T08:27:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : डिझेलची सातत्याने दरवाढ होत असल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणारी सर्वच कृषी कामे महागली आहेत. एकिकडे शेतमजूर ...

Economic blow to farmers | शेतकऱ्यांना आर्थिक फटका

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : डिझेलची सातत्याने दरवाढ होत असल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणारी सर्वच कृषी कामे महागली आहेत. एकिकडे शेतमजूर मिळत नाहीत, बैलजोडी ठेवणे परवडत नाही तर दुसरीकडे ट्रॅक्टरद्वारे होणारी मशागत आणि इतर कामांचे दर वाढल्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

सद्या बीड जिल्ह्यात डिझेलचा दर प्रतिलिटर ८३.११ रुपये आहे. १ जानेवारी २१ रोजी ८०.३१ रुपये प्रतिलिटर दर होता. म्हणजे २७ दिवसांत जवळपास अडीच रुपयांनी डिझेल वाढले आहे. एक वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये डिझेल प्रतिलिटर ७७.०५ रुपये होते. म्हणजे वर्षभरात डिझेल हे जवळपास सहा रुपयांनी प्रतिलिटर वाढले आहे.

डिझेलचा दर जरी शेकडा दोन टक्क्यांनी वाढत असला तरी डिझेलचे कारण पुढे करून वाहतूक खर्च, कृषीवरील खर्च मात्र जवळपास दहा टक्क्यांनी वाढतो. ही तफावत न समजणारी आहे. याचा फटका मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला बसताना दिसत आहे. ट्रॅक्टरद्वारे होणारी कामेही हेच कारण सांगूण महागली आहेत. वाढणारा खर्च आणि होणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नाही.

गेल्या चार पाच वर्षांपासून शेती पिकत नाही. कधी अतिपावसामुळे तर कधी पावसाअभावी पिकांना फटका बसतो. यदाकदाचित पीक आलेच तर त्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. पिकांचा उतारा कमी येतो. डिझेलचे भाव वाढले म्हणून ट्रॅक्टरच्या शेतीकामाचे दर वाढवले आहेत. शेतीखर्च परवड नाही.

- रामा मुळे (शेतकरी मोठेवाडी)

दिवसेंदिवस डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत. दुसरीकडे ट्रॅक्टर आणि शेती अवजारांच्या किमंतीही वाढल्या आहेत परंतु, शेतकरी मात्र कृषी कामांचे दर वाढवत नाहीत. अनेक वर्षांपासून जवळपास आहे, तेच दर आहेत. या दरात काम करणे परवडत नाही परंतु, स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकही सोडावे वाटत नाही.

- रतन खाडे (ट्रॅक्टर चालक, मोठेवाडी, ता. माजलगाव)

शेती करणे परवडत नाही. मजुरी भरमसाठ वाढली आहे. कधीकधी तर मजुरांअभावी अनेकांचे शेत पडित पडते. ट्रॅक्टरने नांगरणी, पेरणी आदि कामे परवड नाही. छोट्या कामांसाठी ट्रॅक्टरही येत वेळेवर नाहीत. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था आहे.

सतीश जगताप, शेतकरी, पालसिंगण

मशागतीचा एकरी ४००० रुपये खर्च

मशागतीचा दर प्रतिएकरी चार ते साडेचार हजार रुपये झाला आहे. मोठे काम असेल तर ट्रॅक्टरचालक राजी होतात. परंतु, छोट्या कामांसाठी वेळेवर भेटत नाहीत.

रोटाचा दर दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढविला असला तरी इतर कृषी कामांचा दर मात्र गतवर्षीच्या तुलनेत आहे तसाच असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Economic blow to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.