बीडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील भंगार वाहनांतून दीड लाखांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 19:29 IST2018-10-30T19:26:55+5:302018-10-30T19:29:13+5:30
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात बेवारस असलेल्या १३१ वाहनांचा मंगळवारी लिलाव करण्यात आला.

बीडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील भंगार वाहनांतून दीड लाखांची कमाई
बीड : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात बेवारस असलेल्या १३१ वाहनांचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. ७० हजारांपासुन सुरू झालेला लिलाव १ लाख ५३ हजारांवर अंतीम ठरला. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या उपस्थितीत हा लिलाव पोलीस मुख्यालयावर पार पडला.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी महिन्यापूर्वी सर्व ठाण्यांमध्ये बेवारस असलेल्या वाहनांची माहिती मागविली होती. त्याप्रमाणे सर्व वाहने एकत्र करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील कार्यवाही पूर्ण करीत मंगळवारी लिलाव करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. ७० हजार रूपयांपासून बोलीला सुरूवात झाली. १ लाख ५३ हजार रूपयांवर अंतीम ‘वार’ करण्यात आला. या लिलावासाठी जवळपास ४० पेक्षा अधिक अर्ज गुन्हे शाखेकडे आले होते.