अवकाळी पावसाने कमाल झाली, माजलगाव धरणाची पातळी २ 'से.मी'ने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:07 IST2021-06-03T18:04:52+5:302021-06-03T18:07:00+5:30

Rain in Beed : मान्सूनपुर्व पाऊस दोन दिवसापासून पडत असल्याने नाल्या , वडे वाहु लागली आहेत.

Due to un seasonal rains, the level of Majalgaon dam increased by 2 cm | अवकाळी पावसाने कमाल झाली, माजलगाव धरणाची पातळी २ 'से.मी'ने वाढली

अवकाळी पावसाने कमाल झाली, माजलगाव धरणाची पातळी २ 'से.मी'ने वाढली

ठळक मुद्देयावर्षी चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.सलग दोन वर्षात बेमोसमी पावसामुळे पाणी पातळीत वाढली आहे

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील माजलगाव धरणाची पाणी पातळी बुधवारी झालेल्या पहिल्याच बेमोसमी पावसाने दोन से.मी.ने वाढली. बेमोसमी पावसावर सलग दुसऱ्या वर्षी पाणी पातळीत वाढ झाल्याने  शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्यावर्षी मे महिन्यात माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेमोसमी जोरदार पाऊस पडल्याने 2 जुन रोजीच धरणाच्या पाणी पातळीत दोन टक्के वाढ झाली होती.त्यानंतर परतीच्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दिड ते दोन महिने धरणातून सिंदफना नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कालव्याद्वारे अनेक वेळा पिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.

यावर्षी चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मान्सूनपुर्व पाऊस दोन दिवसापासून पडत असल्याने नाल्या , वडे वाहु लागली आहेत. बुधवार रोजी रात्री 29 मी.मी. जोरदार पाऊस पडला होता. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. माजलगाव धरणात 2 जुन रोजी427.44 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 193.60 दलघमी ऐवढा एकुन पाणी साठा होता तर 51.60 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व 16.60 टक्के पाणी होते.3 जुन रोजी धरणात रोजी427.460 मिटर ऐवढा पाणी साठा होता. धरणात 194.40 दलघमी ऐवढा एकुन पाणी साठा होता तर 52.40 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता तर 16.79 टक्के पाणी साठा झाला होता.बेमोसमी पहिल्याच पावसात 0.25 टक्के पाणी पातळी वाढली. या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग दोन वर्षात बेमोसमी पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे. 

Web Title: Due to un seasonal rains, the level of Majalgaon dam increased by 2 cm