शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा राहिल्याने पाणीपुरवठा योजनांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:23 IST

मांजरा धरणात चार महिने संपले, पावसाळा लोटला, तरी अद्यापही धरणात पाणी आले नाही.

ठळक मुद्देअंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अत्यल्प पावसामुळे मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंब या मोठ्या शहरांसह आसपासच्या खेडयापाडयांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात चार महिने संपले, पावसाळा लोटला, तरी अद्यापही धरणात पाणी आले नाही. परिणामी आगामी काळात सात लाख नागरिकांची तहान भागवायची कशी, हा मोठा प्रश्न प्रशासनाला भेडसावणारा ठरत आहे. परतीचा पाऊस झाल्यानंतर धरणाचा पाणीसाठा वाढेल, अशी अपेक्षा लोक बाळगून होते. मात्र, तीही फोल ठरली. पावसाने दिलेल्या दग्यामुळे भविष्यात मोठे जलसंकट निर्माण होणार आहे.  

अंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. झालेल्या पावसामुळे पेरण्या झाल्या मात्र, पाणीसाठा वाढला जाईल, असा एकही पाऊस जून ते सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत झाला नाही. जर आष्टी, पाटोदा, मांजरसुंबा या परिसरात मुसळधार पाऊस झाला तरच मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होते. मात्र, गेल्या वर्षी मोठा पाऊस झाल्याने  धरण भरले होते. भरलेल्या धरणातील पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले होते. तसेच पाणीपुरवठा योजनांची मोठी भिस्त असते. यावर्षी धरणातला पाणीसाठा शंभर टक्क््यावरून १.३७ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. ९८ टक्के पाण्याचा वापर वर्षभरात झाला.

या हंगामात आतापर्यंत एकही मोठा पाऊस न झाल्याने जमिनीवरून पाणी अद्यापतरी वाहिले नाही. परिणामी मांजरा धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढला नाही. शहराच्या पाणीपुरवठ्याची मोठी भिस्त मांजरा धरणावरच आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा संपत आल्याने धरणातून पाणीपुरवठा कधी ठप्प होईल. याची धास्ती अंबाजोगाईकरांना आहे.  अत्यल्प पावसामुळे मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन तसेच पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता हा साठा आणखी कमी होणार आहे.  शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा आधार घेतला जातो. 

उपलब्ध असलेले पाणी कसेबसे तीन ते चार महिने शहरवासियांना देता येईल.  संपूर्ण पावसाळा लोटला तरी एकदाही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले आहेत. ग्रामीण भागातही पाण्याची स्थिती पावसाअभावी दयनीय झाली आहे. परतीच्या पावसाच्या अपेक्षा बाळगून शेतकरी व नागरिक आशा ठेवून होते. मात्र तीही फोल ठरली. आता दसऱ्याच्या कालावधीत तरी पाऊस पडतो की नाही हीच शेवटची आशा शेतकरी बाळगून आहेत. 

पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षितमांजरा धरणात सध्या १.३७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शेती अथवा इतर बाबींना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

मांजराभोवतालचे प्रकल्पही कोरडेठाकमांजरा धरणात पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी डोकेवाडा, अप्परमांजरा, वाघेबाभुळगाव, महासांगवी हे प्रकल्प भरल्यानंतर पाण्याचा प्रवाह धरणात येतो. संपूर्ण पावसाळा लोटला तरी मोठा पाऊस न झाल्याने आजूबाजूचे प्रकल्पच भरले नाहीत. तर धरणात पाणी येणार कोठून? अशा स्थितीमुळे पाणीपुरवठ्याची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण पावसाळा संपला तरी पाऊस न झाल्याने पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणBeedबीडAmbajogaiअंबाजोगाईWaterपाणीRainपाऊस