घरगुती वाद विकोपाला गेले; चुलत्याने १६ वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करून संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:38 IST2022-11-24T12:37:57+5:302022-11-24T12:38:46+5:30
सुरज कृष्षा शिंदे याचे आणि चुलता गणेश अर्जून शिंदे याच्यासोबत घरगुती वाद होते.

घरगुती वाद विकोपाला गेले; चुलत्याने १६ वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करून संपवले
वडवणी ( बीड) : तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील 16 वर्षीय तरूणाचा घरगुती वादातून चुलत्यानेचे बेदम मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. सुरज कृष्षा शिंदे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आज सकाळी आरोपी चुलत्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरज कृष्षा शिंदे याचे आणि चुलता गणेश अर्जून शिंदे याच्यासोबत घरगुती वाद होते. बुधवरील रात्री चुलत्या - पुतण्याचे याच वादातून जुंपले. गणेशने संतापाच्या भरात सुरजला बेदम मारहाण केली. सुरज गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ अवस्थेत पडून होता. त्याला गावकऱ्यांनी बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारसाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू, सपोनी आनंद कांगुणे, पोहेकाॅ चंद्रसेन माळी, विलास खरात, भास्कर राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी गणेश शिदे यास आज सकाळी देवडी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सपोनी आनंद कांगुणे यांनी दिली.