शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात घटले डॉक्टरांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाच्या काळात इतरांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी धावपळ करणाऱ्या डॉक्टरांचे आरोग्य बिघडल्याचे दिसत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाच्या काळात इतरांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी धावपळ करणाऱ्या डॉक्टरांचे आरोग्य बिघडल्याचे दिसत आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या या महामारीमुळे डॉक्टरांचे वजन घटल्याचे समोर आले आहे. असे असले तरी त्यांनी रुग्णसेवेकडे दुर्लक्ष केले नसल्याचे दिसत आहे.

कोरोनाकाळात डॉक्टरांवर मानसिक ताण तर होताच, शिवाय धावपळही वाढली. त्यामुळे राेजचा व्यायाम, नियमित व वेळेवर आहार मिळाला नाही. याचा परिणाम आरोग्यावर झाला. मानसिक आणि शारीरिक ताण येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे; परंतु अपवादात्मक वगळता सर्वच डॉक्टरांनी कौतुकास्पद सेवा दिलेली आहे.

कोरोनामुळे रोजचा व्यायामही कमी

आपल्या आरोग्यासाठी डॉक्टर रोज योगा व व्यायाम करत असे; परंतु कोरोनामुळे अनेकांचा नियमित केला जाणारा व्यायाम आता बंद आहे.

त्यामुळे काहींचे आरोग्य बिघडले आहे. असे असले तरी त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला नाही. काही अपवाद वगळता सर्वच डॉक्टर सेवा देतात.

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तर सेवा देतच आहेत; परंतु खाजगी डॉक्टरही रोटेशनप्रमाणे शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णसेवा करत असल्याचे दिसून येत आहे. याचा रुग्णांना फायदा होत आहे.

शारीरिक आणि मानसिक ताण एकाचवेळी आल्याने परिणाम

पहिल्या लाटेत कोरोनाचे रुग्ण कमी होते; परंतु दुसऱ्या लाटेत परिस्थिती भयानक झाली. डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडत होती.

अशावेळी आहे त्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. त्यांची धावपळ वाढली.

यामुळेच डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडत चालले असून, प्रतिकारशक्ती कमी होत आहे.

या महामारीत शारीरिक आणि मानसिक ताण वाढला आहे. मात्र, प्रोफेशनल लाइफ आहे, त्यामुळे दूर पळून चालणार नाही. पुरेशी झोप होत नाही. या सर्व धावपळीत माझे चार किलो वजन कमी झाले आहे. असे असले तरी माझी सेवा सुरूच आहे. रुग्णसेवा देताना कष्ट घ्यावे लागत असले तरी त्यात आनंद आहे. माझ्यासारखेच अनेक डॉक्टर या महामारीत कोरोनाबाधित झाले आणि त्यावर त्यांनी मातही केली.

-डॉ. अनिल बारकुल, ज्येष्ठ फिजिशियन

प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासह कोरोना वॉर्डमध्ये जाऊन राऊंडही घेतो. अशावेळी वेळेवर जेवण होत नाही. तसेच पुरेसा आरामही मिळत नाही. या धावपळीत अंदाजे पाच किलो वजन कमी झाले आहे. मानसिक ताणामुळे चिडचिड वाढली आहे.

-डॉ. महेश माने, जिल्हा रुग्णालय, बीड

मी तर दिवसरात्र धावपळ करतच आहे. माझे वजनही थोडे कमी झाले. माझे सर्व सहकारी उत्तम काम करत आहेत. या महामारीत काम करताना त्यांचे आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे; परंतु त्यांनी सामान्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले नाही.

-डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड