शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही डॉक्टरांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा ...

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तिकडे होत असल्याने या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या होत आहेत. अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतानाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या अंबाजोगाईसाठी गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २० दिवसांत ६०० पेक्षा जास्त रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निघाले आहेत. येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात अंबाजोगाईसह परळी, धारूर, केज, माजलगाव येथील रुग्णांची उपचाराची सोय याच रुग्णालयात आहे. अंबाजोगाईत असणारे कोविड रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झालेले आहे. याच रुग्णांना उपचारासाठी डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील नेत्र विभागाचे डॉ. एकनाथ शेळके, बधिरीकरण शास्त्र डॉ. प्रसाद सुळे, तर औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. सदानंद कांबळे या तिघांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीसाठी जळगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कारण वैद्यकीय प्रशासनाने दिले आहे.

त्या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करा

अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉ. एकनाथ शेळके, डॉ. प्रसाद मुळे, डॉ. सदानंद कांबळे यांच्या जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर होणाऱ्या बदल्या रद्द कराव्यात, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिले आहे. अंबाजोागईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

पुन्हा आंदोलनाची वेळ

यापूर्वीही ३४ डॉक्टरांच्या बदल्या मुंबई येथे करण्यात आल्या होत्या. त्याचा विपरित परिणाम आरोग्य सेवेवर झाला होता. त्यावेळी या डॉक्टरांच्या बदल्या रद्द करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयाच्या दारात ठिय्या मांडून धरणे आंदोलन केल्याने त्या डॉक्टरांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या. आता पुन्हा तीन डॉक्टरांच्या बदल्याचा प्रश्न पुढे आला आहे. या डॉक्टरंच्या प्रतिनियुक्तीमुळे रुग्णालयात रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार आहे.