शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दूध डेअरीसाठी पत्नीचा छळ करीत दिला तलाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

गेवराई : दूध डेअरी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत छळ करणाऱ्या पतीने बेकायदेशीरपणे तलाक ...

गेवराई : दूध डेअरी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत छळ करणाऱ्या पतीने बेकायदेशीरपणे तलाक दिल्याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात सासरकडील १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई शहरातील कोरबू मोहल्ला येथील फळविक्रेते सय्यद खालेद अहमद यांची मुलगी मुस्कान हिचा विवाह काही वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील इंदिरानगर गारखेडा परिसरातील शेख हारूण शेख अलाउद्दीन याच्यासोबत थाटात झाला होता. आम्हाला काहीही नको, तुम्ही द्याल त्यात समाधानी म्हणत मुलाकडील मंडळींनी हा विवाह लावला. शहरातील तैय्यबनगर येथील तैय्यबऊलुम ( दारूल उलूम) मध्ये धर्मगुरूंच्या उपस्थितीत विवाह झाला होता.

लग्न झाल्यावर काही महिन्यानंतर पती शेख हारूण शेख अलाउद्दीन, सासरा शेख अलाउद्दीन शेख युसुफोद्दीन, सासू शेख मेहरुन्निसा शेख अलाउद्दीन, दीर शेख हाफिजोद्दीन शेख अलाउद्दीन, शेख समियोद्दीन शेख अलाउद्दीन, शेख इतर शेख अलाउद्दीन, शेख रजियोद्दीन शेख अलाउद्दीन, नणंद सय्यद शबाना सय्यद मोईन, शेख आईशा शेख अलाउद्दीन, शेख फातेमा शेख मोइन, कुलसुम शफी फुलारी आणि जाऊ शेख शहनाज शेख हाफिजोद्दीन यांनी संगनमत करून विवाहिता शेख मुस्कान हिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला उपाशी ठेवून मारहाण करणे, शिव्याशाप देणे, टोमणे मारू लागले. जोपर्यंत माहेराहून दूध डेअरी टाकण्यासाठी पाच लाख रुपये आणत नाही, तोपर्यंत तुला माफी नाही, असे म्हणत जाच करू लागले. तसेच पतीने बेकायदेशीरपणे तलाक, तलाक, तलाक म्हणत तलाक दिला. अखेर पीडिता मुस्कान हिने आपले माहेर गाठले. सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अर्चना भोसले या तपास करत आहेत.