शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बीडमध्ये सुनावणीच्या चाळणीतून ४०० गुरुजी ठरणार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:57 IST

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दर्जावाढ देण्यात आलेल्या व नंतर रद्द केलेल्या शिक्षकांची न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन दिवस सुनावणी झाली. या चाळणीतून ४०० शिक्षक अपात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देप्राथमिक पदवीधर दर्जावाढीचे प्रकरणदोन दिवस सुनावणी, कार्यवाही लवकरच

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दर्जावाढ देण्यात आलेल्या व नंतर रद्द केलेल्या शिक्षकांची न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन दिवस सुनावणी झाली. या चाळणीतून ४०० शिक्षक अपात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक पदवीधर शिक्षकांना दर्जावाढ देण्याचा मुद्दा चार वर्षानंतर ऐरणीवर आला आहे. या संदर्भात न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने १९ आणि २० मार्च रोजी संबंधित १०७२ शिक्षकांची सुनावणी घेतली. सुनावणीचा अहवाल लवकरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे सादर होणार आहे. तोपर्यंत दर्जावाढ मिळालेल्या तसेच वेतनवाढीचा लाभ मिळालेल्या शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.जर अपात्र ठरलो तर आॅर्डरसाठी मोजलेल्या पैशांचे काय, याची चिंता शिक्षकांना लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १०७२ पेक्षा जास्त शिक्षकांना नियुक्ती आदेश दिल्याचे या सुनावणीदरम्यान प्रथमदर्शनी आढळून आले.

गुरुजींच्या तोंडाला उग्र वास कशाचा हो ?माजलगाव तालुक्यातील मनूरवाडी येथील विष्णू भगवान झोंबाडे नामक शिक्षक सुनावणीला त्याची बाजू मांडण्यासाठी आला होता. या प्रक्रियेदरम्यान त्याच्या तोंडातून उग्र दर्प आल्याने त्याच्यावर पोलीस कारवाईबाबत हालचाली सुरु होत्या. दरम्यान जि. प. वर्तवणूक अधिनियमानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते.चाळणीत कोण अडकणार, कोण सुटणार...?विषयनिहाय टक्केवारीच्या प्रमाणात बसणारे व सेवाज्येष्ठता असणाºया शिक्षकांना दर्जावाढ कायम राहू शकते.ज्यांच्याकडे पदवी प्रमाणपत्र आहे, तसेच जि. प. नियमानुसार नियुक्तीबाबत प्रधिकृत अधिकाºयाचे त्याच्या कार्यकाळातील आदेश आहेत, असेच शिक्षक या चाळणीतून सहीसलामत राहतील.मात्र पदवी शिक्षण व परीक्षा देताना शिक्षण विभागाची पर्यायाने शासनाची परवानगी घेतली होती का? हा मुद्दाही विचारात घेतला जाऊ शकतो.आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता शून्य असताना दर्जावाढीचे आदेश मिळालेले शिक्षक या चाळणीत अडकणार आहेत.१०७२ शिवाय अनेक शिक्षकांनाही नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. ते आदेश कोणाच्या स्वाक्षरीचे आहेत. स्वाक्षरी खरी की खोटी याचीही शहानिशा जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.प्राथमिक पदवीधरांना दर्जावाढीचे आदेश दिल्यानंतर पुढील प्रक्रिया तीन तीन महिने लांबविण्यात आली होती. त्यामुळे तारखेची खातरजमा होणार असल्याचे कळते.मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी सेवामुक्त झाल्यानंतरही तीन महिने नियुक्ती आदेश दिले जात होते. त्यामुळे संबंधित अधिकाºयाचा कार्यकाळ व आदेशाचा दिनांक याची खात्री करण्यात येणार आहे. यातही काही शिक्षकांची गोची होणार आहे.नियमबाह्यपणे व संगनमताने नियुक्ती आदेश प्राप्त करुन शासन व प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अपात्र ठरलेल्यांवर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर नियुक्ती देणाºयांवरही कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकBeedबीडzpजिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र