शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

राष्ट्रवादीने बारा किमीचा तरी रस्ता केला का? - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:51 PM

मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देगेवराईच्या कार्यक्रमात पवार समर्थकांच्या घोषणा :पालकमंत्री म्हणाल्या, ‘जे तुमच्या मनात तेच माझ्या मनात’

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा आहे, ही जाण केंद्र व राज्यातील भाजप सरकारला असल्यामुळेच कधी नव्हे तो कोट्यवधी रु पयांचा विकास निधी या जिल्हयात आला, रस्ते, रेल्वे व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठी कामे याठिकाणी झाल्याने हा जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी गेवराई येथे केले. दरम्यान, मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.राष्टÑीय महामार्गाच्या येडशी- औरंगाबाद टप्प्याचे लोकार्पण आणि इतर विकास कामांच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. लक्ष्मण पवार, आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे,आ. आर.टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे , जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर यांच्यासह विविध पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, २०१४ मध्ये गडकरी यांच्याकडे रस्ते विकास खाते आले आणि त्यांनी प्रत्येक जिल्हयात हजारो कोटी रु पयांचे रस्ते निर्माण केले. या रस्त्यामुळे मराठवाड्यात विकासाची नवी पहाट उगवली. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर हा गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे याची सत्तेला जाण होती. म्हणून जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला मिळाला. माझा जिल्हा कोल्हापूर, सांगलीसारखा झाला पाहिजे, यासाठी आपण काम केले. रेल्वे, रस्ते, प्रशासकीय इमारती तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी निधी आणला. जलयुक्त शिवार मधून पाण्याची टंचाई दूर केली. उज्ज्वला योजनेतून महिलांच्या डोळ्यातील धुराचा त्रास कमी केला. संपूर्ण स्वच्छता योजनेतून शौचालय उभारून स्वच्छता आणि आरोग्य सुधारले असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस यांनीही भाषण केले. बीड, माजलगाव, गेवराई तालुक्यातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.साहेबांनी शब्द दिला अन् मी तो पाळलाआ. लक्ष्मण पवार यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे यांनी ‘आम्ही शब्द पाळणारे आहोत’ असे सांगितले. त्या म्हणाल्या, बाप्पासाहेब पवार यांना त्यांच्या मुलाला आमदार करण्याचा शब्द लोकनेते मुंडे साहेबांनी दिला होता. पण तो शब्द पंकजा मुंडेंनी पाळला आणि पहिले तिकीट जाहीर केले. माझ्या मनात कसलाही संकोच नाही. तुम्हीच मध्यंतरी कुणाला घरी बोलावले, सत्कार केले. मी मात्र या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मण पवार यांच्या मागणीवरून निधी दिला, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असेही त्या म्हणाल्या.बारा आमदार दिले, काम काय केले?पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच केला नाही. मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषद आमदारकी त्यांनी वाटली, जिल्ह्यात बारा आमदार दिले पण या बारा आमदारांनी बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, हा सवाल आपण त्या नेतृत्वाला केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेत कधी प्रशासकीय इमारती दिल्या नाहीत. रस्ते, पाणी,वीज यासाठी झगडावे लागले. लाख, २ लाख देऊन बोळवण केली जायची.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस