शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांना वाटलं मी राजकारणातून संपून जाईल,पण..."; मोठ्या नेत्यांच्या षडयंत्रावर धनंजय मुंडेंचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:17 IST

'राज्यातील मोठ्या नेत्याने मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट रचला होता'; धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा

- संजय खाकरे

परळी (जि. बीड): "नगरपालिका निवडणुकीच्या काळात राज्यातील मोठे मोठे नेते मला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या तयारीत होते. मला बदनाम करण्यासाठी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले," असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. गुढीपाडव्यानिमित्त परळीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जनतेने षडयंत्र हाणून पाडलेलोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात मुंडे पुढे म्हणाले की, "विरोधकांना वाटले असेल की मी संपेल, पण परळीच्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. सर्व प्रकारची बदनामी सहन करूनही जनता महायुतीच्या पाठीशी ठाम उभी राहिली." यावेळी मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता राज्यातील बड्या नेत्यांवर निशाणा साधला, ज्याचे राजकीय अर्थ आता काढले जात आहेत.

वैद्यकीय सुविधा आणि घरकुलांची भेटदुसऱ्या एका कार्यक्रमात मुंडे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील ६७७ पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी १ लाख रुपये वितरित करण्यात आले. तसेच रमाई घरकूल योजनेच्या २०० नवीन घरांच्या आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, परळीत वैद्यकीय महाविद्यालय होणार नसले तरी, गोरगरिबांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधा देणारी मोठी वैद्यकीय वास्तू उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. "पुढील तीन महिन्यांत या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल," असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, डॉक्टरांनी रात्री आणि रविवारी देखील अत्यावश्यक सेवा द्यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर , नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, परळी पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. गोविंद  फड, बीड जिल्हा परिषद माजी गटनेते अजय मुंडे, दिव्यांग कल्याण महामंडाळचे राज्याचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रभारी मुख्याधिकारी पी.एन.निगळ, प्रा. डॉ. मधुकरराव आघाव, ॲड. गोविंद फड, डॉ. मनोज मुंडे, प्रणिता मुंडे आदींची उपस्थिती होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Conspiracy against me failed, Dhananjay Munde alleges political plot.

Web Summary : Dhananjay Munde alleges a conspiracy by senior leaders to politically destroy him during municipality elections. Despite facing targeted defamation, public support prevailed. He announced housing project benefits and plans for an advanced medical facility in Parli, urging doctors to provide essential services.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेस