शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

धनंजय मुंडेंवर खापर फोडून धस, क्षीरसागरांपाठोपाठ मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 12:24 AM

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेच्या डोक्यावर खापर फोडून आ. सुरेश धस, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागरांपाठोपाठ नंदकिशोर मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर पडले. मुंदडांनी भाजप तर क्षीरसागरांनी शिवसेनेला जवळ केले.

बीड : विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेच्या डोक्यावर खापर फोडून आ. सुरेश धस, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागरांपाठोपाठ नंदकिशोर मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर पडले. मुंदडांनी भाजप तर क्षीरसागरांनी शिवसेनेला जवळ केले.एकेकाळी धनंजय मुंडे, आ. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे जिल्ह्यावर राष्टÑवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. आता या दिग्गजांंपैकी पंडित आणि धनंजय मुंडे वगळता बाकी सर्वजण बाहेर पडल्यामुळे राष्टÑवादीची अवस्था कमकुवत झाली आहे. राष्टÑवादीतून बाहेर पडताना या सर्व मंडळीनी धनंजय मुंडेंच्या गटबाजीला कंटाळून आम्ही बाहेर पडत आहोत, असे म्हटले होते. राष्टÑवादीचा फोडाफोडीचा फॉर्म्युुला जिल्ह्याच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावरच उलटवत जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे काबीज केली. आज बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. बीडचा मतदारसंघ राष्टÑवादीच्या ताब्यात होता. परंतु, जयदत्त क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्टÑवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. राष्टÑवादीप्रमाणेच बीड जिल्ह्यातील शिवसेनेलाही उतरती कळा लागली होती परंतु, क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. क्षीरसागरामुळे बीड जिल्ह्यातील महायुतीचीही ताकद वाढली आहे. कारण क्षीरसागरांना मानणारा मोठा मतदारवर्ग जिल्ह्यात आहे. अनेक संस्था ताब्यात असल्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी मोठी यंत्रणा आज त्यांच्या ताब्यात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर आणि इतर मंडळींशी जयदत्त क्षीरसागर यांचा चांगला समन्वय आहे. भाजपने माजलगावमध्ये विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांना बदलून रमेश आडसकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे मोहन जगताप बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. तसे घडले तर त्याचा फटका भाजपाला बसू शकतो. राष्टÑवादीत बंडखोरीची शक्यता नाही. अपेक्षेप्रमाणे सर्वांनाच उमेदवारी मिळाली आहे. केजमध्ये नमिता मुंदडा यांना शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, नमिता यांनी भाजपत प्रवेश केला आहे. ज्यांनी स्थापनेपासून राष्टÑवादीत येऊन तीन वेळा आणि भाजपकडून दोन वेळा विधानसभेवर निवडून आल्या, त्या माजी मंत्री विमल मुंदडा यांचे घराणे भाजपात गेले आहे. नमिता मुंदडा यांना भाजपाची उमेदवारी जवळपास मिळाल्यातच जमा आहे. केजमध्येही नमिता मुंदडा यांच्यासाठी भाजपाने विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांची उमेदवारी नाकारल्यात जमा आहे. भाजपने पाचपैकी दोन विद्यमान आमदारांची उमेदवारी कापून क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSuresh Dhasसुरेश धस