'अप्पा, तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय शब्द लावताना काळीज जड होते'; धनंजय मुंडे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 15:37 IST2021-12-12T15:36:27+5:302021-12-12T15:37:07+5:30
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

'अप्पा, तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय शब्द लावताना काळीज जड होते'; धनंजय मुंडे भावूक
बीडः आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Goprinath Munde) यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून विविध नेते त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनीही ट्विटरवरुन काका गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे.
धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहताना एक भावूक ट्विट केले आहे. 'स्व. अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते.'
स्व. अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे, तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा... pic.twitter.com/oXJAeM3EDO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2021
'ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे, तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा...' असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांचे हे भावूक ट्विट सध्या चर्चेत आहे.
शरद पवार अख्खी कारकीर्द
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त धनंजय मुंडे यांनी पवार यांनाही शुभेच्छा दिल्या. त्यांनी एका ट्टिवटमध्ये लिहिले, पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब म्हणजे केवळ एक नाव नाही, ते एक कारकीर्द, एक मोहीम आणि एक वसा म्हणून लोकसिद्धत्व प्राप्ता झालेले नेतृत्व आहेत. साहेबांना 81 व्या जन्मदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.