धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड ! सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, दरपत्रकच केले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:51 IST2025-02-21T10:50:02+5:302025-02-21T10:51:16+5:30
बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आ.धस यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड ! सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, दरपत्रकच केले जाहीर
बीड :धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असतानाच्या काळात बदली, पदोन्नती पैसे घेऊन केल्या जात होत्या. त्याचे पदानुसार रेटकार्डच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गुरूवारी जाहीर केले. अगदी ६० हजार रुपयांपासून पैसे घेतले जात होते. सर्वात जास्त १० कोटी रूपये हा दर पुण्याच्या संचालक गुणनियंत्रण आयुक्त कार्यालय या पदाचा होता. बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आ.धस यांनी केला आहे.
धस यांनी यापूर्वी कृषी विभागातील अनेक घोटाळे उघड केले होते. तसेच पीक विमा घोटाळाही त्यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. आता गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी धनंजय मुंडे कृषिमंत्री असतानाचे अनेक घोटाळे समोर आणले. यासोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीचा मुद्दाही चव्हाट्यावर आणला. कशाप्रकारे नियमबाह्य बदल्या करून पैसे घेऊन पदस्थापना दिली जात होती हे मांडले. धस यांनी अधिकारी, कर्मचारी अशा ७५ जणांच्या नावासह रेटकार्ड जाहीर करून माध्यमांनाही दिले. भांबरे, पवार, कराड या अधिकाऱ्यांसह स्वत: धनंजय मुंडे यांच्या खिशात हे पैसे गेल्याचा आरोपही धस यांनी केला.
कोणत्या पदासाठी किती दर आकारला जात होता?
कृषी सहायक ६० हजार
कृषी पर्यवेक्षक १ लाख ५० हजार
कृषी अधिकारी ३ लाख
क्षेत्रीय मंडळ अधिकारी २ लाख
कार्यालयीन कृषी अधिकारी २ लाख
तालुका कृषी अधिकारी ५ लाख
तंत्र अधिकारी ४ लाख
उपविभागीय कृषी अधिकारी ७ लाख
कृषी उपसंचालक ५ लाख
जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी ९ ते ३० लाख
विभागीय कृषी संचालक
(ठाणे विभाग) ८० लाख
विभागीय कृषी संचालक (पुणे, नाशिक, कोल्हापूर, छ. संभाजीनगर) ६० लाख
विभागीय कृषी संचालक
(अमरावती, नागपूर) ४० लाख
संचालक गुणनियंत्रण कृषी
आयुक्त पुणे १० कोटी
मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी,
पुणे २ कोटी
कृषी उपसंचालक, खते १ कोटी
मुख्य निरीक्षक बियाणे ५० लाख
कृषी अधिकारी गुणनियंत्रण १ कोटी
तंत्र अधिकारी गुणनियंत्रण २ कोटी
कृषी अधिकारी कीटकनाशके (राज्यांतर्गत) ६० लाख
कृषी अधिकारी कीटकनाशके (राज्याबाहेर) ८० लाख
तंत्र अधिकारी बियाणे ४० लाख
तंत्र अधिकारी गुणनियंत्रण
(अमरावती-२) ५० लाख
तंत्र अधिकारी गुणनियंत्रण
(पुणे-२) ७० लाख
तंत्र अधिकारी गुणनियंत्रण
(ठाणे-५) १ कोटी
तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (नाशिक-३, लातूर