शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

धम्मात जगाच्या कल्याणाचा विचार सामावला भिक्खू ज्ञानरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

अंबाजोगाई :

चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला भन्ते उपगुप्त महाथेरो (पुर्णा), भिक्खू ज्ञानरक्षीत (औरंगाबाद), भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.

स्वागताध्यक्षपदी प्रा.प्रदिप रोडे हे होते. या धम्म परिषदेला परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष अ‍ॅड.अनंतराव जगतकर तर यावेळी आ.संजय दौंड यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी चंद्रशेखर वडमारे, भास्कर रोडे, डॉ.विनोद जगतकर, सरपंच बळीराम मिसाळ, उपसरपंच, अभियंता दत्तात्रय भिसे, प्रयागबाई मिसाळ, प्रा.दासुु वाघमारे, परळीभुषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.माधव रोडे यांची उपस्थिती होती. संयोजन समितीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशानुसार सर्व निर्देशांचे पालन केले.

या प्रसंगी बोलताना आ.संजय दौंड यांनी चांदापुर येथील तक्षशिला बौद्धधम्म प्रतिष्ठाणला आपण यापुढील काळात सर्वोतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे सांगुन हा परिसर विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून असे सांगत धम्म परिषदेच्या आयोजनासाठी दरवर्षी २५ हजार रूपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पुज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांनी चांदापुर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याचे सांगुन धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करून दानाची भावनिकता वाढवावी. धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे. यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू, उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपगुप्त महाथेरो म्हणाले. भंते धम्मशील यांनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला लोककल्याणाचा मार्ग सांगितला आहे. बुध्दाचा धम्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे, असे सांगितले. यावेळी भिक्खू ज्ञानरक्षित यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला तथागतांचा शुध्द धम्म दिला. भारतीय संविधानात मानवी कल्याणाचा जो विचार सामावला आहे. तो वंदनीय बाबासाहेबांनी ञिपीटीकातून घेतला आहे. आपल्याला कायद्याने सुरक्षित केले आहे. धम्म विचारांत जगाच्या कल्याणाचे सुख सामावले असल्याचे यावेळी धम्मरक्षित यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले.

स्वागताध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी केले चांदापुर येथे नवे ऊर्जा केेंद्र निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना अ‍ॅड.अनंतराव जगतकर यांनी बुद्ध धम्माची महती विषद केली. चारित्र्यसंपन्न व नितीमान समाज निर्माण करण्यााठी धम्म आचरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.जगतकर यांनी केले. या धम्म परिषदेत १४ विविध महत्वपुर्ण ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले.