देवगावच्या ऊसतोड मजुराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 19:52 IST2018-06-22T19:49:28+5:302018-06-22T19:52:00+5:30
देवगाव येथील ऊसतोड मजुराचा मुलगा अमोल मुंडे याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

देवगावच्या ऊसतोड मजुराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक
केज (बीड ) : तालुक्यातील देवगाव येथील ऊसतोड मजुराचा मुलगा अमोल मुंडे याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने हे यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
देवगाव येथील रामराव विश्वनाथ मुंडे हे उसतोड मजूर आहेत. असे असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. इंजिनिअर असलेल्या अमोल याने चिकाटीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत यात यश संपादन केले. अमोलचा एक भाऊ सैन्य दलात तर दुसरा पोलीस खात्यात कार्यरत आहे.