माजलगावात नगराध्यक्षांच्या लेटरपॅडवर उपनगराध्यक्षांची सही; चौकशी कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:44 IST2026-02-12T13:44:26+5:302026-02-12T13:44:59+5:30

लोकशाहीत निवडून आलेल्या महिला प्रतिनिधीच्या अधिकारांवर गदा

Deputy Mayor's signature on Mayor's letterhead in Majalgaon; Who will investigate? | माजलगावात नगराध्यक्षांच्या लेटरपॅडवर उपनगराध्यक्षांची सही; चौकशी कोण करणार?

माजलगावात नगराध्यक्षांच्या लेटरपॅडवर उपनगराध्यक्षांची सही; चौकशी कोण करणार?

माजलगाव : येथील नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या लेटरपॅडचा वापर करून उपनगराध्यक्षांनी स्वतःची सही केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. लोकशाहीत निवडून आलेल्या महिला प्रतिनिधीच्या अधिकारांवर गदा आणून सुरू असलेल्या या 'पडद्यामागच्या' कारभाराची चौकशी आता नेमकी कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नगराध्यक्षा महिरीन शिफा बिलाल चाऊस यांच्या लेटरपॅडवर त्यांचे सासरे तथा उपनगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी स्वाक्षरी करून मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिल्याने पालिकेतील अधिकार कोणाचे? असा पेच निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे पालिकेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. परंतू गुरूवारपर्यंत यात कोणीही चौकशीला सुरूवात केली नसल्याची माहिती आहे.

सीओंची भूमिका स्पष्ट
सही कोणी केली हे तपासायचे माझे काम नाही, अशी स्पष्ट भूमिका माजलगावचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी मांडली आहे.

Web Title : माजलगाँव: महापौर के लेटरहेड पर उप महापौर के हस्ताक्षर, जाँच की मांग

Web Summary : माजलगाँव में उप महापौर द्वारा महापौर के लेटरहेड पर हस्ताक्षर करने से विवाद। अधिकार और पारदर्शिता पर सवाल उठे। जाँच की मांग की गई, लेकिन अधिकारियों ने शुरू नहीं की। मुख्य अधिकारी ने कहा हस्ताक्षर सत्यापन उनकी जिम्मेदारी नहीं है।

Web Title : Majalgaon: Deputy Mayor's Signature on Mayor's Letterhead Sparks Inquiry Demand

Web Summary : Controversy erupted in Majalgaon after the Deputy Mayor signed the Mayor's letterhead. Questions arise about authority and transparency. An investigation is demanded, but officials haven't started one. The Chief Officer stated signature verification isn't his responsibility.