माजलगावात विद्यार्थ्यांची उपविभागीय कार्यालयावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:13 AM2019-07-09T00:13:26+5:302019-07-09T00:13:59+5:30

विद्यार्थी व पालकांनी येथील विद्यार्थी नेते मनोज फरके यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली

Demonstrations at the sub-divisional office of the students at Majalgaon | माजलगावात विद्यार्थ्यांची उपविभागीय कार्यालयावर निदर्शने

माजलगावात विद्यार्थ्यांची उपविभागीय कार्यालयावर निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : वैद्यकीयशिक्षण क्षेत्रातील ७०/३० प्रादेशिक आरक्षण प्रणालीमुळे मराठवाडयातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या प्रश्नी शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी येथील विद्यार्थी नेते मनोज फरके यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी ‘मराठवाडयावर अन्याय करणारे ७०/३० वैद्यकीय आरक्षण रद्द करा’ या घोषणेने हा परिसर दणाणून गेला. मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांना देण्यात आले.
यावेळी प्रा. प्रशांत तौर, प्रा. राजाभाऊ सोळंके, बाबूराव जाधव, प्रा. दत्ता फपाळ, प्रा. दत्ता बहीर, प्रा. भगवान गायकवाड, प्रा. गणेश सुरवसे, प्रा. एजाज देशमुख, प्रा. कैलास गव्हाणे, वसंत हजारे, सतीश थोरात, महेश सावंत, गोंविद शिंदे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Demonstrations at the sub-divisional office of the students at Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.