भरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:06 IST2019-07-22T13:04:43+5:302019-07-22T13:06:15+5:30
रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिली धडक

भरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा तडफडून मृत्यू
गेवराई (बीड ) : तालुक्यातील अर्धामसला फाटा येथे सोमवारी (दि.२२ ) सकाळी 11 वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत एका हरणाचा तडफडुन मृत्यू झाला. हरणास वाचविण्याचे ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले मात्र गंभीर जखमी असल्याने त्याचा मृत्यू झाला.
तालुक्यातील अर्धामसला फाटा येथे 11 वाजता एक हरण रस्ता ओलंडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. जोरदार धडकेने हरणाचा पाय तुटला होता तसेच पोटाला गंभीर जखम झाली होती. या दरम्यान, येथून जाणारे ग्रामस्थ अशोक नरवडे, पप्पु नरवडे, नारायण मस्के, सुभाष नांद्रे, सोनाजी कुरे यांच्या हे निदर्शनास आल. त्यांनी जखमी हरणास उचलून रस्त्याच्या बाजूला नेले, पाणी पाजले. मात्र, जखम गंभीर असल्याने हरणाचा तडफडून मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या माहितीनंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.