कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:35 IST2021-02-06T13:35:13+5:302021-02-06T13:35:28+5:30
घरातील सर्व झोपित असताना पहाटे घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन
गेवराई : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पन्नास वर्षीय शेतकऱ्यांनी आपल्या घरात समोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.6 ) पहाटे उघडकीस आली. विजय श्रीराम पवार ( वय 50 ) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील गावखोर तांडा मधील विजय श्रीराम पवार ( वय 50 ) यांच्यावर कर्ज होते. नापिकी व अस्मानी संकटामुळे घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत जात होता. यामुळे पवार आर्थिक विवंचनेत होते. यातूनच त्यांनी घरातील सर्व झोपित असताना पहाटे घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
शनिवार पहाटे घरातील सर्व मंडळी जागे झाले असता ही घटना उघडकीस आली. यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. माहिती मिळताच तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार खाडे, वरकड, तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, पत्नी व आई असा परिवार आहे.