कन्यारत्न पाहून परतणाऱ्या पित्याचा धारुरमध्ये अपघाती मृत्यू; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:56 IST2018-11-24T00:56:26+5:302018-11-24T00:56:52+5:30
चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहून परतणाºया पित्यावर काळाने झडप घातली. येथील राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. आंबेडकर चौकाचे बांधकाम सुरु असलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

कन्यारत्न पाहून परतणाऱ्या पित्याचा धारुरमध्ये अपघाती मृत्यू; एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहून परतणाºया पित्यावर काळाने झडप घातली. येथील राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. आंबेडकर चौकाचे बांधकाम सुरु असलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
सय्यद मुन्ना (वय ३२, रा. केज) असे त्या पित्याचे नाव असून, सय्यद तैसूर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लातूर येथे उपचारार्थ हलवले आहे.
मुन्ना यास चार दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. तिला पाहण्यासाठी तो व तैसूर धावडी येथे गेले होते. तेथून धारुरमार्गे परतत असताना सायंकाळी अंधारामुळे चौकासमोरील खड्डा लक्षात आला नाही. परिणामी दोघेही गाडीसह खड्ड्यात कोसळले.