उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील मासे अज्ञातकारणाने मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 17:27 IST2018-06-30T17:26:55+5:302018-06-30T17:27:52+5:30
उपळी, गावंदरा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामधील मासे अज्ञात कारणाने मृत पावली आहेत.

उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील मासे अज्ञातकारणाने मृत
बीड : उपळी, गावंदरा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामधील मासे अज्ञात कारणाने मृत पावली आहेत. प्रकल्पातील पाण्यावर हि मासे तरंगताना दिसत असून यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
जिल्ह्यातील उपळी, गावंदरा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील सर्व मासे अज्ञात कारणाने मृत पावल्याची घटना आज उघडकीस आली. पाण्यात या मृत मास्यांचा खच पडला असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. तसेच यामुळे प्रकल्पातील पाणी दुषित होत आहे. उपळी, गावंदरा या दोन्ही गावांना याच प्रकल्पावरील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हा मध्यम प्रकल्प असून दहा ते बारा किंमी अंतरापर्यंत पाण्याचा उसावा (बॅकवॉटर) असतो.