बीड : लिंबागणेशमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा; १२ लाखांचा रोकड, दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 12:21 IST2023-06-11T12:20:39+5:302023-06-11T12:21:10+5:30

तालुक्यातील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शनिवारी मध्यरात्री धाडसी दरोडा पडला.

Daring robbery at Maharashtra Gramin Bank in Limbaganesh 12 lakhs cash jewelery looted | बीड : लिंबागणेशमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा; १२ लाखांचा रोकड, दागिने लंपास

बीड : लिंबागणेशमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा; १२ लाखांचा रोकड, दागिने लंपास

बीड : तालुक्यातील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शनिवारी मध्यरात्री धाडसी दरोडा पडला. यात १२ लाख रूपयांची रोकड व दागिने दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. घटनास्थळी पोलिसांचे पथक रवाना झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. या दरोड्याने मात्र, सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांजरसुंबा-पाटोदा रोडवर लिंबागणेश गाव आहे. येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. शनिवारी मध्यरात्री दरोडेखाेर बँकेच्या पाठिमागील बाजूने लोखंडी शिडी लावून खिडकीपर्यंत पोहचले. त्यानंतर गॅस कटरने खिडकी तोडून आत प्रवेश केला. स्ट्राँग रूममध्ये ठेवलेली रोख रक्कम व काही दागिने असा १२ लाख रूपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले.

हा प्रकार रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर नेकनूर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच बँकेचे अधिकारीही घटनास्थळी आले होते. सर्व चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Daring robbery at Maharashtra Gramin Bank in Limbaganesh 12 lakhs cash jewelery looted

टॅग्स :Beedबीड