तेलगाव परिसरात धाडसी घरफोडी; चाकूने हल्ला करत साडेतीन लाखांचा ऐवज पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 15:36 IST2021-07-30T15:35:12+5:302021-07-30T15:36:52+5:30

रोख २ लाख ४० हजार रुपये असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला.

Daring burglary in Telgaon area; thieves attacked with a knife and looted Rs 3.5 lakh | तेलगाव परिसरात धाडसी घरफोडी; चाकूने हल्ला करत साडेतीन लाखांचा ऐवज पळवला

तेलगाव परिसरात धाडसी घरफोडी; चाकूने हल्ला करत साडेतीन लाखांचा ऐवज पळवला

दिंद्रुड ( बीड ) :  तेलगाव येथील श्रीकृष्ण पार्क येथील लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करत महिला व पुरुषांना मारहाण करत रोख रक्कम आणि दागिने असा साडे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. या धाडसी चोरीमुळे तेलगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

दिंद्रुड पोलीस हद्दीत मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. या पूर्वीच्या चोऱ्यांचा अद्याप बाकी असतानाचा तेलगाव येथील धारूर रोडलगत असणाऱ्या श्रीकृष्ण पार्क येथील एका रोहाऊसमध्ये गुरुवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरात चार चोरट्यांनी प्रवेश केला. कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. चाकूने हल्ला करत महिलेच्या अंगावरील दागदागिने काढून घेतले. तसेच रोख २ लाख ४० हजार रुपये असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. जखमी महिलेवर तेलगाव येथील खाजगी रुग्ण्यालयात उपचार सुरु आहेत. 
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधीक्षक सुरेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा भरत राऊत आणि दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पुढील तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Daring burglary in Telgaon area; thieves attacked with a knife and looted Rs 3.5 lakh