धरण उशाला, पाणी मिळेना शेतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST2021-03-21T04:31:52+5:302021-03-21T04:31:52+5:30
वडवणी : तालुक्यातील सोन्ना खोट्टा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्पातील डाव्या कालव्यातील बंद पाईपलाईनद्वारे बाहेगव्हाणच्या २५ शेतकऱ्यांच्या ५० एकर ...

धरण उशाला, पाणी मिळेना शेतीला
वडवणी
: तालुक्यातील सोन्ना खोट्टा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्पातील डाव्या कालव्यातील बंद पाईपलाईनद्वारे बाहेगव्हाणच्या २५ शेतकऱ्यांच्या ५० एकर शेतीसाठी अद्यापही पाणी मिळत नाही. दहा दिवसात पाणी उपलब्ध करून न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. बाहेगव्हाण येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
तालुक्यातील बाहेगव्हाण शिवारात गट क्रमांक ३६५, ३६७, ३३३, ५३, ३६२, ३५०, ३४० ,३४८ ,३६८ मधील ४० ते ५० एकर जमीन धरणाच्या जवळच आहे. यातील गट क्रमांक ३६५ मधून ही बंद पाईपलाईन गेलेली आहे.तरीही शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध होत नाही. सोन्ना खोट्टा येथील अत्यंत महत्त्वाकांक्षी उर्ध्व कुंडलिका प्रकल्प हा तालुक्याचे नंदनवन करणारा आहे. मात्र तो काही शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरला आहे. शेजारी गटातील जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या चुकीने आमची जमीन ओलिताखाली येत नाही. सध्या येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस,उन्हाळी बाजरी, भुईमूग इत्यादी पिकाची लागवड केली आहे. पाणी न मिळाल्यास ही पिके जळून जातील व मोठा आर्थिक फटका बसेल, अशी व्यथा मांडत शेतीला पाणी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
या निवेदनावर सुदाम धोंडिबा मस्के, शिवाजी धोंडिबा मस्के, भगवान धोंडीबा मस्के,सतीश लक्ष्मण वाघमारे,भागवत गंगाधर मस्के, बबन काशिनाथ नागवे,दगडू वैजुबा नागवे, गुलाब हरिभाऊ मस्के, अशोक सुदाम मस्के, संभाजी सुदाम मस्के, मनोहर शिवाजी मस्के, अंकुश शिवाजी मस्के, गोविंद भगवान मस्के, वैभव भगवान मस्के, गुलाब हरिबा मस्के, मुक्ताबाई सर्जेराव मस्के, दत्ता लक्ष्मण अलगट, खंडू यशवंत नागवे, मथलसाबाई खंडू नागवे,चक्रधर खंडू नागवे, सर्जेराव हरिभाऊ मस्के, रामदास रावसाहेब मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आमरण उपोषणानंतर आत्मदहन सोन्नाखोट्टा येथील धरणाच्या पाण्याचे आम्ही सगळ्यांनी स्वप्न बघितले होते. मात्र अधिकारी व इंजिनियर यांनी मिळून आम्हाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. डोळ्यादेखत पाणी दुसऱ्याच्या शेतात जाते तेव्हा पोटात आग होते.'पाणी उशाला आहे मात्र घशात येईना' अशी आमची अवस्था झाली आहे. इंजिनियरला विचारले तर ते म्हणतात, तुमचा भाग कमांडमध्ये नाही. त्यामुळे पाणी देता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावे.-चक्रधर नागवे, शेतकरी
धरणाचे पाणी फक्त २८०० हेक्टरलाच
प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन करताना बाहेगव्हाण, चिंचोटी,साळींबा, तिगाव,पुसरा,यासह इतर गावातील फक्त २८०० हेक्टर जमिनीलाच पाणी देता येईल असे केलेले आहे. तो भाग कमांडमध्ये नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याच्या जमिनी या रेल्वेच्या भू-संपादनात गेलेल्या आहेत. म्हणून त्यांना पाण्याचा लाभ देता येईल. तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार केला असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. -सुनील अपसिंगेकर, अभियंता, पाटबंधारे विभाग बीड.
===Photopath===
200321\20bed_3_20032021_14.jpg