कोरोना टेस्टसाठी व्यापाऱ्यांची गर्दी, अँटिजन किटचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:03+5:302021-03-17T04:34:03+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने व्यापारी मंडळीना कोविड तपासणी करणे बंधनकारक केली आहे. सुरुवातीला शासनाच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी ...

कोरोना टेस्टसाठी व्यापाऱ्यांची गर्दी, अँटिजन किटचा तुटवडा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने व्यापारी मंडळीना कोविड तपासणी करणे बंधनकारक केली आहे. सुरुवातीला शासनाच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रशासनाने कडक भूमिका घेतली. कोरोना टेस्ट न करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध दुकान सील करून फौजदारी कारवाईचे आदेश काढले. तपासणी केली की नाही यासाठी व कारवाईसाठी धारूर शहरात चार पथके तहसील कार्यालयाने नियुक्त केले. मागील तीन दिवसात ७०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. यात अँटिजन व आरटीपीसीआर दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे या टेस्ट सेंटरवर कर्मचारी अपुरे पडत आहेत. परिणामी व्यापाऱ्यांना ताटकळावे लागत आहेत. दोन दिवसांपासून, तर अँटिजन टेस्टसाठी आवश्यक किटची कमतरता असल्याने महसूल प्रशासनाने व्यापाऱ्यांना टेस्टसाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.
व्यापारी मंडळीच्या टेस्ट सध्या सुरू असून, दोन दिवसांत टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अँटिजन व आरटीपीसीआर दोन्ही टेस्टची सुविधा आहे. अँटिजन किटची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली असून, लवकरच उपलब्ध होतील, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी सांगितले.