दुकानांमध्ये गर्दी, अन् दुचाकी चालकांवर कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:58+5:302021-06-04T04:25:58+5:30
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा आकडा वाढला होता आणि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पण आठवडाभरापासून हा आकडा कमी ...

दुकानांमध्ये गर्दी, अन् दुचाकी चालकांवर कारवाया
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा आकडा वाढला होता आणि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पण आठवडाभरापासून हा आकडा कमी होऊन कोरोना उतरणीला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. असे असताना प्रशासनाने काही ठराविक दुकानांना वेळेचे निर्बंध घालून उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र यात जवळपास सर्वच दुकाने उघडली जाऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याचे दिसून आले. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेच्या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित असताना पोलिसांकडून मात्र कामानिमित्त येणाऱ्या दुचाकी चालकांना अडवून अर्वाच्च भाषेत बोलून कारवाई केली जाते. जशी दुचाकीवर कारवाई होते तशी उघड्या व पाठीमागून दार उघडून व्यवहार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दीपक गरूड यांनी उपस्थित केला आहे.
===Photopath===
030621\20210602_115012_14.jpg