कापूस वेचणीचे भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST2020-12-26T04:26:53+5:302020-12-26T04:26:53+5:30
बीड शहरात अवैध प्रवासी वाहतूक बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागात सध्या खाजगी ...

कापूस वेचणीचे भाव वाढले
बीड शहरात अवैध प्रवासी वाहतूक
बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागात सध्या खाजगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.
दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. यामुळे वेळोवेळी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे; परंतु अद्यापही ग्राहकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असून, ही कारवाई करण्याची मागणी आहे.