Coronavirus : बीडकरांना धक्का : २४ दिवसानंतर दोन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 22:10 IST2020-05-16T22:10:04+5:302020-05-16T22:10:29+5:30

गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील रुग्ण

Coronavirus: Shock to Beed citizens : Two corona positive patients after 24 days | Coronavirus : बीडकरांना धक्का : २४ दिवसानंतर दोन कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : बीडकरांना धक्का : २४ दिवसानंतर दोन कोरोना पॉझिटिव्ह

बीड : मुंबईहून आलेल्या दोघांचा कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतला. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पहिला रुग्ण मुक्त झाल्यानंतर २४ दिवसांनी पुन्हा २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बीडकरांना हा मोठा धक्का बसला आहे.

गेवराई तालुक्यातील ईटकूर येथील एक कुटुंब मुंबईतील हॉटस्पॉट भागातून आले होते. या चौघांचेही स्वॅब घेतले. त्यापैकी तिघांचे निगेटिव्ह आले, तर १२ वर्षी मुलगी पॉझिटिव्ह आढळली. माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील २९ वर्षीय व्यक्ती पत्नीसह मुंबईहून आला होता. त्या दोघांचेही शनिवारी स्वॅब घेण्यात आले. त्यात पत्नीचा निगेटिव्ह आला, तर पतीचा पॉझिटिव्ह आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तो कोरोनामुक्त होऊन  २४ दिवसांचा कालावधी उलटला आहे.

Web Title: Coronavirus: Shock to Beed citizens : Two corona positive patients after 24 days