coronavirus : बीडकरांना दिलासा; 'दुबई रिटर्न' महिलेचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:30 IST2020-03-20T18:29:47+5:302020-03-20T18:30:58+5:30

दुबई इथे बहिणीकडे गेलेली महिला बीडमध्ये परतली होती.

coronavirus: Relief to people of Beed ; 'Dubai Returns' woman reports negative | coronavirus : बीडकरांना दिलासा; 'दुबई रिटर्न' महिलेचा अहवाल निगेटिव्ह

coronavirus : बीडकरांना दिलासा; 'दुबई रिटर्न' महिलेचा अहवाल निगेटिव्ह

ठळक मुद्देअफवांवर विश्वास ठेवू नये,

बीड : दुबईहुन परतलेल्या महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच जिल्हा रुग्णलायातील गुरूवारी दुपारी आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या तिची प्रकृती ठणठणीत आहे. तिचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सामान्यांसह आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.

दुबई इथे बहिणीकडे गेलेली महिला बीडमध्ये परतली होती. पुण्याहून बीडला आल्यानंतर सकाळीच तिला सर्दी, ताप अशी लक्षणे जाणवू लागली. आरोग्य विभागाने तत्काळ या महिलेला दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने तिची तपासणीही केली. त्यानंतर स्वॅप घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याचा अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाला. यात अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले आहे. नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

Web Title: coronavirus: Relief to people of Beed ; 'Dubai Returns' woman reports negative