CoronaVirus: 'Odd-Even' formula for relaxation of curfew in Beed district, to be effective from Monday | CoronaVirus : बीड जिल्ह्यात संचारबंदी शिथिलतेसाठी 'ऑड-इव्हन' फॉर्म्युला; सोमवारपासून होणार लागू

CoronaVirus : बीड जिल्ह्यात संचारबंदी शिथिलतेसाठी 'ऑड-इव्हन' फॉर्म्युला; सोमवारपासून होणार लागू

ठळक मुद्देजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचार बंदी व जमावबंदी आदेश लागू आहेत. या कालावधीत  जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या सुरू ठेवण्यात येण्याच्या वेळांबाबत ६ एप्रिल २०२० पासून मोठा बदल करण्यात आले आहेत. त्या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी  राहुल रेखावार  यांनी लागू केले आहेत.

सदर आदेशानुसार जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई , परळी व माजलगाव या चार शहरांच्या हद्दीत वस्तूंच्या सेवा देणाऱ्या अस्थापना विषम दिनांकास जसे 7, 9, 11 व 13 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालू राहतील. तर या चार शहरांची हद्द वगळता उर्वरित जिल्ह्याचा भागांमध्ये या या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत देणारा आस्थापना सम दिनांक जसे 8, 10, 12 व 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.

कोरोना विषाणू  संसर्ग पसरू नये यासाठी जिल्ह्यात 14 एप्रिल 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेले विविध आदेश सुधारणा आदेश लागू आहेत . तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वेळा आस्थापनांसाठी वरील सुधारित आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: CoronaVirus: 'Odd-Even' formula for relaxation of curfew in Beed district, to be effective from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.